Thursday, December 3, 2020
घर इतर डिजिटायझेशनमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे झाले सोपे

डिजिटायझेशनमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे झाले सोपे

जगात डिजिटलयाझेशनच्या नेतृत्वाखाली पुढची तंत्रज्ञान क्रांती होत आहे. पूर्वी स्टॉकब्रोकर्स आणि ट्रेडर्स जेव्हा
ट्रेडिंग फ्लोअर्समध्ये भेटत आणि व्यवहार करत असत. मात्र ते आता डिजिटल स्वरुपात होत आहे. पूर्वी
स्टॉकब्रोकर्सकडे बाजाराची मक्तेदारी होती. त्यांची अंतर्दृष्टी आणि शिफारशी हेच गुंतवणूकदारांसाठी माहितीचे
स्रोत होते. मात्र डॉट कॉम क्रांतीनंतर यात महत्त्वपूर्ण बदल झाला. ऑनलाइन मंचांच्या आगमनामुळे माहिती
परवडणारी आणि प्रत्येकाला सहज उपलब्ध होऊ लागली. परिणामी ट्रेडिंग ही भौतिक फ्लोअर्सपर्यंत मर्यादित
न राहता डिजिटल माध्यमांद्वारे अधिक प्रमाणात प्रवेश करण्यायोग्य बनली.

शेअर बाजाराच्या ट्रेडिंगसाठी मोबाइल अँपची संख्या वाढताना ही पद्धत अधिक मजबूत होताना दिसत
आहे. ट्रेडिंगसाठीचे ऑनलाइन मंच आणि मोबाइल अँपने जगातील व्यापाऱ्यांना माहितीसमृद्ध आणि तत्काळ
निर्णय घेण्यास सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. यानुसारच व्यापारात जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यात
डिजिटलायझेशनची भूमिका स्पष्ट होते.

ट्रेडिंग विश्वातील प्रवेशातील अडथळे दूर: ज्ञानाच्या अभावामुळे बराच काळ लोक शेअर बाजारात गुंतवणूक
करण्यास धजत नव्हते. पारंपरिक दृष्टीकोन असल्यामुळे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी स्टॉकब्रोकर्सचा
पाठपुरावा करावा लागत असे. या प्रक्रियेतून भरगोस ब्रोकरेज शुल्क आणि इतर छुपे खर्चही होत असत. मात्र
आता सरकार आणि नियामकांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ई केवायसीसारख्या ऑनलाइन ट्रेडिंग आणि
डेव्हलपमेंटमु‌ळे यूझर्सना यापुढे व्यापार सुरू करण्यासाठी रांगेत उभे रहण्याची गरज नाही. ब्रोकर्सशी त्यांचा
व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आता मोबाइल अँपद्वारे संपर्क साधला जातो. तसेच आता
त्रासदायक पेपरवर्क आणि देखभाल खर्च नसल्यामुळे असंख्य ब्रोकरेज फर्मदेखील डिजिटायझेशनचा लाभ घेत,
ग्राहकांना झीरो फी ट्रेड्स किंवा इतर गोष्टींसाठी माफक शुल्क आकारत आहेत.

महत्त्वाची माहिती तत्काळ उपलब्ध: ट्रेडिंगमध्ये माहिती ही गुरुकिल्ली आहे. स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये
डिजिटलायझेशनच्या क्रांतिद्वारे तीच अधिक सक्षम केली जाते. मोबाइल अँपवर उपलब्ध असलेली ऑनलाइन
ट्रेडिंगची सुविधा अतिशय अस्थिर क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करत, रिअल टाइममध्ये महत्त्वाची
माहिती प्रदान करते. डिजिटल माध्यमांद्वारे ट्रेडिंग केल्यामुळे यूझर्सना शेअर्सच्या किंमती कधीही, कुठेही, रिअल
टाइममध्ये उपलब्ध होतात. स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक मिनिट किंबहुना प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्यामुळे
गुंतवणुकदारांना यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

तसेच पारदर्शक आणि प्रभावी ट्रेडिंग धोरणांमुळे गुंतवणूकदारांच्या एका मोठ्या वर्गासाठी मार्केट खुले
झाले. इलेक्ट्रॉनिक व्यापाराने जगभरातील वेगवेगळ्या स्टॉकमार्केटमधील व्यापारात क्रांती घडवून आणली
आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, जागतिक शेअर बाजाराचे एकत्रिकरण. इलेक्ट्रॉनिक
ट्रेडिंगमुळे एकत्रिकरणात योगदान देणारे जगभरातील लिक्विडिटीचे स्रोत एकत्र केले जातात.

कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत स्वयंचलन: शेअर बाजारातील व्यवहार डिजिटल मेकओव्हर करत असतानाच
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) नेतृत्वात भरपूर प्रमाणात संधी खुल्या होत आहेत. महत्त्वाचा डेटा सहजपणे उपलब्ध असल्यामुळे एआय आणि त्याचे उपखंड उदा. मशीन लर्निंग आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया हे ऐतेहासिक
पॅटर्न, सध्याचे ट्रेंड्स, बातम्या आणि अपडेट्स इत्यादीचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

यावरून कोणता शेअर अधिक चांगली कामगिरी करेल याचा अंदाज लावता येतो. ही माहिती डिजिटल सॅव्ही
ट्रेडर्सकडे तयार स्वरुपात मिळते. त्यामुळे ते तत्काळ निर्णय घेण्यास सक्षम ठरतात. रांगेत उभे राहणे किंवा
ब्रोकर्सचा पाठलाग करण्याऐवजी रोबो ऍडव्हायजर्सकडे प्रश्न विचारून रिअल टाइममध्ये उत्तरेही मिळवता
येतात. एकूणच, ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे उद्योगात अधिक
पारदर्शकता आणणे. आता कोणतीही माहिती मोजक्या लोकांपुरती मर्यादित न राहता ती सर्वांसोबत
शेअर केली जात आहे. यासह ट्रेडर्सदेखील ऑर्डरचा प्रवाह, किंमती, लिक्विडिटीची माहिती शोधू शकतात.
एखादा शेअर किंवा कंपनीविषयी माहिती सहज उपलब्ध असल्यामुळे व्यापारी बराच माहितीपूर्ण निर्णय घेऊ
शकतात. तसेच उत्कृष्ट पारदर्शकता असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत होते. अशा प्रकारे रितसर मदत करत स्टॉक ट्रेडिंगद्वारे त्यांना संपत्ती निर्माण करण्यास मदत होते.

लेखक :- श्री निलेश गोकरल, मुख्य परिचालन अधिकारी, एंजल ब्रोकिंग लिमिटेड

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel