Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली

करोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग करोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी