परतुर – लक्ष्मीकांत राऊत – अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष तारीख सिद्धीकी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा तडकाफडकी देत भाजपा गोटात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या सिद्धीकी यांनी पक्षाची मुस्लिम विरोधात असलेली ध्येयधोरणे पक्ष कार्य करताना अडचणीची ठरत असल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव लोणीकर यांच्यासाठी हा राजीनामा मोठा धक्का समजला जात आहे, अशावेळी जेव्हा त्यांच्यात व रावसाहेब दानवे यांच्यात अंतर्गत कलह टोकाचा सुरू आहे. सिद्धीकी यांच्या राजीनामा देण्याचे खरे कारण वेगळेच असल्याचीही चर्चा सुरू आहे. कोणत्याही पक्षात जाण्याचा आपला तूर्त विचार नाही मात्र सामाजिक कार्यात यापुढे जास्त सक्रिय राहणार असल्याचे तारेख सिद्दीकी यांनी सांगितले.