Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र आंबेली येथे डंपरचा अपघात

आंबेली येथे डंपरचा अपघात

आंबेली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे आज चिरे वाहतुक करणारा डंपर रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात स्टेरींग लॉक होवून रस्ता सोडून गटारात कलंडला. सुदैवाने कोणालाही दुखापत नाही. दोडामार्ग ते तिलारी या रस्त्यावर असे अनेक अपघात होत असतात. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. नागरिकांनी रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून अनेक निवेदने देवुनही सार्वजनिक बांधकाम विभाग या विषयावर वेळोवेळी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

या लेखकाची अन्य पोस्ट