कोल्हापूर – मरगळलेल्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली एकात्मिक बांधकाम नियमावली आज जाहीर करण्यात आली. या संदर्भात राज्यभरातल्या बांधकाम संघटनांनी पाठपुरावा केला होता. या नियमावलीचा कोल्हापूरलाही मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे दीड हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामासाठी आता महापालिकेच्या परवानगीची कटकट लागणार नाही. केवळ शुल्क भरलेल्या पावत्या, हेच परवानगीसाठी गृहीत असेल. त्यामुळे सर्वसामान्यांची हेलपाट्यातून मुक्तता होणार आहे. त्याचवेळी शहरात आता 70 मीटर उंच इमारती उभारण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.