Monday, April 12, 2021

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज शनिवारी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्याप्रसंगी जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. नागरगोजे यांच्यासह सहकारी डॉक्टर उपस्थित होते. यानंतर आ. रत्नाकर गुट्टे यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना पुढे येऊन लस घेण्याचे आवाहन केले. इतिहासातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार मानले. 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 60 वर्षाहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणासाठी नागरिक को- विन 2.0 पोर्टलवरून किंवा आरोग्य सेतू सारख्या इतर ॲप वरून आपली नोंदणी करू शकतात. नागरिकांमध्ये लसीबाबत विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी लस घ्यावी असे आव्हान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी याप्रसंगी केले.

रिपोर्ट पोस्ट

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी