कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले. अपघात कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील कणकवली येथील माऊली देवी देवस्थानच्या प्रवेशव्दारासमोर दुपारी १२.४० च्या सुमारास घडला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तर कणकवली व वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.