देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के – ९ हजार २८३ किमी लांबीचे – रस्त्यांची बांधणी एकट्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्या निमित्ताने रस्तेबांधणीसाठी महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटी रुपयांचा निधी आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात ५० हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रात नऊ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यासाठी मंत्रालयाने एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे.