जळगांव : दीक्षाभूमीवर जाणारे व येणारे अनुयायी व गरजूंना समाजप्रति संवेदना, आपुलकी निर्माण व्हावी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान सेवा रेल्वे स्थानक येथे राबविण्यात आली पाचशे अन्नाची पाकिटे विविध ठिकाणी गरजूंना वाटण्यात आली. या वेळी जवान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष ईश्वर मोरे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. आप्पा साळवे, दिगंबर सोनवणे, राजू सोनवणे, राहुल किरण भामरे आदींनी सहकार्य केले.