राज्य शासनाने घेतलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील बेलुरा येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु. किरण गणेश काकडे हिने फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुप मध्ये 94.60 गुण प्राप्त केले आहेत. किरण काकडे सामान्य कुटुंबातील असून तिने पूरस्थिती वर मात करून यश संपादन केल्याने तिची सर्वच स्तरातून स्तुती होत आहे.