कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन नराधमांना अवघ्या तासाभरात टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम गाणे आणि बळीराम गायकवाड असं या नराधमांचं नाव आहे (Titwala Gang Rape Case). पाणी मागण्याच्या बहाण्याने हे दोन्ही नराधम घराजवळ आले. त्यानंतर घरात घुसून एका 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणीय टिटवाळा पोलिसांनी दोन्ही नराधमांना गुन्हा दाखल होण्याच्या एक तासातच अटक केली आहे.