मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील प्रा. डॉ. सुमेधा सुदर्शन नाईक यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार 24 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता . महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 85 मानकऱ्यांमध्ये डॉ. सुमेधा नाईक यांचा समावेश होता.