जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला मंदीचा कल झुगारून देशांतर्गत सराफा बाजारात गुरुवारी सोन्या चांदीच्या किमती वधारल्याने दिसून आले. सोन्याचे भाव चार महिन्यांनी ( 24 नोव्हेंबर)पुन्हा 50 हजारांच्या खाली आले होते. तेच भाव 30 नोव्हेंबरला आणखी खाली घसरून 48700 व 60000 रुपयांवर स्थिरावले. दरम्यान फायजर कंपनीच्या लसीकरणासाठी युकेची मान्यता मिळाल्याचे वृत्त असल्याने गुरुवारी भारतीय सराफा बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटले. जळगांवच्या सराफा बाजारात सायंकाळी उशिरापर्यंत सोने 50200 रुपये तोळा तर चांदीचे 65000 रुपये किलोने व्यवहार झाले.