Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत आहे व भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.  राज्यातील काही जिल्ह्य़ातील शाळा मध्ये प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पध्दती सुरळीत चालू आहे.

रिपोर्ट पोस्ट

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी