राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार वास्को रेल्वेस्थानक तसेच दाबोळी विमानतळावर उतरणाऱया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय स्थानिक शासकीय अधिकाऱयांनी घेतला आहे. वास्कोतील रेल्वे स्थानकात यापूर्वीही प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. मात्र, नंतर रेल्वे सेवाच बंद झाली. दाबोळी विमानतळावरही उतरणाऱया देशी विदेशी प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. दोन महिन्यांपूर्वी ही तपासणी बंद करण्यात आली होती.