Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल  आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. वरोरा पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. नागपूरहून फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले असून ते घटनस्थळी तपासणी करत असल्याची माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.  या प्रकरणी घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नाही. नागपूरची फॉरेन्सिक टीम सध्या तपास करीत आहे. डॉ. शीतल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून रुग्णालयाकडून तासाभरात शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे हे स्पष्ट होईल.

रिपोर्ट पोस्ट

Anil Dumane
Citizens reporter from nanded

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी