परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, प्रविण कोकांडे, जयंत सोनवणे , लक्ष्मण पिचारे, सोपान ठोंबरे आदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.