Friday, August 6, 2021

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 18 जूनपर्यंत मुदतवाढ

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे . सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षा करिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्यास दिनांक १८ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
M.A. Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी