मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महा आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण तिसऱ्यांदा विजयी झाले आहे. तुमच्या विजयाबद्दल परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या समोर महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना खाऊ घालून विजय जल्लोष साजरा केला. याप्रसंगी महापौर प्रताप देशमुख, अण्णा दुधाटे यांच्यासह महा विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.