दिल्ली येथे पंजाब हरियाणासह देशभरातील शेतकर्यांनी शेतकरी विरोधी तीन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरु केले आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी गुरुवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत दिल्लीतील आंदोलनास शेतकरी संघर्ष समितीने समर्थ देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.