ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ग्रामीण विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) परभणीजिल्ह्यात विधानसभानिहाय शिवसेनेचे शेतकरी मेळावे आयोजित केले आहेत.गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा मेळावा पूर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात दुपारी 2 वाजता होणार आहे. परभणी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता तर पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघांचा मेळावा मानवत येथील नेहा मंगल कार्यालयात सायंकाळी 6 वाजता होणार आहे