परभणी तालुक्यातील ताडपांगरी येथील डॉ. प्रेरणा ज्ञानोबा टोमके यांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ मुंबई या विद्यापीठाने केमिकल इंजिनिअरिंग या विषयात पी.एच.डी. प्रदान केली आहे. त्याबद्दल आज शनिवारी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रेरणा वरपुडकर यांनी डॉ. प्रेरणा टोमके यांच्या घरी जाऊन सत्कार करून अभिनंदन केले. डॉ. प्रेरणा टोमके यांना त्यांच्या विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण संशोधनामुळे याआधी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच सध्या त्या पिण्याच्या पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या रोगांवर संशोधन करत आहेत. यापूर्वी त्यांना प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या यशाप्रमानेच यातही यश मिळावे व त्यांच्याकडून त्यांच्या गावाबरोबरच जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडावी अशा सदिच्छा वरपूडकर यांनी यावेळी दिला.
कृपया गुण मिळविण्याकरिता आणि गुणांची पूर्तता करण्यासाठी प्रथम आपले प्रोफाइल तयार करा