Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत. निकाल येण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत.

रिपोर्ट पोस्ट

Anil Dumane
Citizens reporter from nanded

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी