पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण तालुक्यात सातत्याने दुर्घटना घडून बळी जात असल्याने पैठण तालुका हादरला आहे. दरम्यान धरणात आढळून आलेले मृतदेह पतीपत्नी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रूग्णालयात हलविले आहेत. येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयात धरण नियंत्रण कक्षा पासून काही अंतरावर शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक पुरुष व एक महिलेचा मृतदेह आढळून आला.