Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली मुदत

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली मुदत

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सक्तवसुली संचनलनालायच्या चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकाऱ्याकडे वेळ मागितली आहे. तसं पत्र त्यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे. प्रताप सरनाईक हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असं म्हटलं जात होतं. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत त्यांना हजर रहायचे होतं. मात्र ते आज ही आलेच नाहीत. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असं सरनाईक यांनी म्हटलं होतं. मात्र, क्वारंटाईनचा कालवाधी उलटून गेल्यानंतरी ते ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

Sonali Mokal
Marathi news content writer

या लेखकाची अन्य पोस्ट