प्लास्टिकचे राष्ट्रीय ध्वज विक्रीवर बंदी आणावी व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि.21) परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे केली.प्रजासत्ताक दिन नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. पण राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज आकार कसा असावा, कुठे फडकला जावा, ह्याबाबत संहिता आहे. त्याचे नागरिक नकळत उल्लंघन करतात. असे झाल्याने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो.