कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प. बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराच्या एका चुकीमुळे आपल्या मालकीच्या गायीचा नाहक जीव गेला व आर्थिक नुकसानहि झाले, अशी तक्रार कोटकामते- उभावाडा येथील शेतकरी सत्यवान सदाशिव चुनेकर यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.