Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना, बीएचआर घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं गिरीष महाजन यांनी स्पष्ट केलंय. ते पुढे म्हणाले, “कोणाच्या पतसंस्थेत घोटाळा झाला तर त्याची चौकशी व्हावी. परंतु, माझ्यावर केवळ राजकीय कारणासाठी आरोप होतोय. बीएचआर घोटाळ्यामध्ये माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असल्यास योग्य ती कारवाई व्हायला हवी. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल.”

Anil Dumane
Citizens reporter from nanded

या लेखकाची अन्य पोस्ट