Sunday, January 24, 2021
Home नागरिक बातम्या भांडाऱ्यातील मृत बालकांच्या नातेवाईकांना मोदी कडून मदत

भांडाऱ्यातील मृत बालकांच्या नातेवाईकांना मोदी कडून मदत

आगीत करुण अंत झालेल्या बालकांच्या नातेवाईकांबरोबरच गंभीर जखमींना मदत करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठा आधार आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सामान्य रुग्णालयाच्या या युनिटमध्ये मध्ये एकूण १७ नवजात बालके दाखल करण्यात आली होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास नवजात बालके ठेवलेल्या कक्षाला अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून पाहिले, तर त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मॉनिटरमध्ये असलेली सात बालके वाचवण्यात आली आहेत तर आउट युनिटमधील १० मुलांचा दुदैवी मृत्यू झाला.

रिपोर्ट पोस्ट

Pranali
I am Happy

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी