Saturday, January 16, 2021
Home राजकारण भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला. दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

Anil Dumane
Citizens reporter from nanded

या लेखकाची अन्य पोस्ट