मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी दाखवलीये. एका मुलाखतीदरम्यान जान सानू म्हणाला, “आम्ही तीन भाऊ असून तिघांनाही माझ्या आईने लहानाचं मोठं केलंय. यामध्ये माझे वडील कधीही आमच्या आयुष्याचे भाग झाले नाहीत. शिवाय एक गायक म्हणून त्यांनी कधीही मला पाठिंबा दिलेला नाही.” जान पुढे म्हणाला, “वडिलांनी आमच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला होता. आणि आता काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या आईने मला कशी शिकवण दिली यावर प्रश्न उपस्थित केले. पण माझ्या मते माझ्या संगोपनाबाबत कोणताही प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही.”