मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत मुंबईकर सिग्नल फ्री प्रवास करु शकतील असा रिंगरुट तयार होणार आहे. सध्या सुरु असलेल्याय वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत शिवडी-नवी मुंबई-विरार-वरळी असा मुंबईकरांचा सिग्नल फ्री प्रवास आकाराला येईल. येत्या दशकात आकाराला येणाऱ्या मुंबईच्या या रिंगरुटची एक महत्वाची कडी असणार आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक.