मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारणाला सुरुवात झाल्याचं दिसतंय. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सत्त्याधाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. नवाब मलिक म्हणाले, “योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात फिल्म सिटी तयार करण्याची गोष्ट करत असून ही चांगलीच बाब आहे. मात्र एक समजून घ्यावं की मुंबईला मिळालेला 100 वर्षांपासूनचा बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही.”