Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आणि आमदार रोहित पवार यांच्या नावाने राष्ट्रवादीला नवा चेहरा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवार यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढायला हवी, अशी भूमिका बऱ्याच वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट