राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लावून संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना दुसरीकडे राज्य सरकार जिल्हा पंचायत निवडणूक घेऊ पाहत आहे. राज्यात निवडणुका घ्यायच्या असल्यास संचारबंदी का लागू करण्यात आली, असा सवाल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला आहे. तसेच खाण व्यवसाय व म्हादईप्रश्नी केवळ आश्वासने नको तर मुख्यमंत्र्यांनी कृती करावी, असेही ते म्हणाले. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत खासदार सार्दिन यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले.