सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं कारण आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने (Sindhudurg District Bank) थकीत कर्जापोटी राणेंच्या ताफ्यात असलेल्या 1 इनोव्हा आणि 13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बजावलेल्या 101 च्या नोटीसा. नितेश राणे यांच्या ताफ्यात दिसणारी आणि रत्नागिरीच्या देवेंद्र वणजू या तत्कालीन काँग्रेस कार्यकर्त्याच्या नावावर खरेदी झालेली इनोव्हा सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.