पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. समता परिषदेच्या वतीने पुण्यात ओबीसी बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता.