Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणात नवी घडामोड घडलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीये. आज बाळ बोठे याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी घरातून शस्त्र जप्त करण्यात आले. मात्र याच्याकडे शस्त्राचं लायसन्स असल्याचं समोरं आलंय. शिवाय बाळ बोठे हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी विमान प्राधिकरणाला देखील सूचना देण्यात आल्यात. 30 नोव्हेंबर रोजी रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. चौकशीअंती पत्रकार बाळासाहेब बोठे याने हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं होतं.

Sonali Mokal
Marathi news content writer

या लेखकाची अन्य पोस्ट