Wednesday, June 16, 2021

विजयबापु डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली, समाज जोडो अभियान सुरू

क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीच्या(महाराष्ट्र शासन) वतीने व स्मारक समितीचे अध्यक्ष विजयबापु डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर व जिल्ह्यातील समाजाच्या संघटना/संस्था प्रमुख,विचारवंत,साहित्यिक, विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन स्मारकाबाबत त्यांची मते,अपेक्षा,सुचना जाणून घेण्यासाठी जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत मातंग समाजाचे नेते आणि स्माराकाच्या लढ्यातील अग्रणी अशोकभाऊ लोखंडे आणि समाजातील विचारवंत भास्कररावजी नेटके यांची समितीचे सन्माननिय सदस्य बाळासाहेब भांडे,राजु धडे,शांतीलाल मिसाळ,रवि पाटोळे,निलेश वाघमारे यांच्यासह भेट घेतली. स्मारक हे समाजाचे प्रेरणास्थान आहे. या प्रश्नावर आम्ही लागणारे सर्व सहकार्य तर करुच,समितीला आजवरचा लढा कसा झाला याची माहिती देत या संदर्भातील दस्तावेज दिले.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी