शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते हे ओळखपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, सुशील चिंदरकर, दीपक आंगणे, नितीन सावंत, राजू गवंडे, कृष्णा तेली, दीपक सावंत, सुयोग ढवण, सुयोग काळप आदी उपस्थित होते.