देशाच्या राजधानीत जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीची चौफेर कोंडी करण्याची धमकी दिल्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते. देशाची राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर अंगदप्रमाणे पाय गाडून बसलेले शेतकरी आरपारच्या मूडमध्ये आहेत. केंद्र सरकार नवीन कृषी कायदा रद्द करीत नाही तोपर्यंत माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरयाणातील लाखो शेतकरी बॉर्डरवर जमले आहे.