वेंगुर्ला बंदर येथील समुद्रात बुडणाऱ्या १८ वर्षीय युवकास येथील जीवरक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील सातारडा येथील पेडणेकर कुटुंबिय वेंगुर्ला बंदर येथे आले होते. त्यातील नयन पेडणेकर हा अठरा वर्षीय युवक बंदराच्या काठड्यावरून खाली पाहत असताना तोल जाऊन समुद्रा मध्ये पडला.