नगरपालिका उपसंचालकाने सांगे नगरपालिका मुख्याधिकाऱ्याना पाठविलेल्या पत्रात दुकानदारांचे 50 टक्के थकबाकी राहिलेले दुकानभाडे माफ करण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला नसल्याचे कळविले असून त्यावर दुकानदारामध्ये खळबळ माजली असून या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी सांगे व्यापारी संघटनेने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारच्या या निर्णयावर निषेध म्हणून बुधवार दिनांक 24फेब्रुवारीला सांगे बाजार बंद ठेवण्याचे ठरविले आहे.