सूरत: गुजरातमधील सूरत येथे एका भयंकर अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कीम रोडवर १८ मजूर झोपले होते. त्याचवेळी रात्रीच्या सुमारास एक अनियंत्रित डंपर चालकाने या सर्वांना चिरडले. अपघातातील सर्व बळी हे राजस्थानमधील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहेत. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सर्व मृतदेह हे पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. काल रात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार डंपर चालक हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे.