देशात स्टीलच्या किंमतींमध्ये मागील काही महिन्यांमधे तब्बल 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारी प्रकल्पांवरती याचा परिणाम होणार असल्याने स्टीलच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावं यासाठी नितीन गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. परंतु स्टीलच्या किंमती वाढण्याचा परिणाम फक्त सरकारी प्रकल्पांवरती होणार नसून घरांच्या किमती देखील सहा ते सात टक्क्यांनी वाढू शकतात असं बांधकाम व्यावसायिकांचं म्हणतात.