वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान यावर सुनावणी गुरुवारी (दि.२१) सुरू असताना यातील माफीचा साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला अचानक चक्कर आल्याने काही काळ गोंधळाची अवस्था झाली. यानंतर कोर्टाने तब्येतीची विचारपूस करून १० मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू केली.