Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र 338 वर्षांनी पहिल्यांदाच गुरू आणि शनीची ऐतिहासिक महा युती

338 वर्षांनी पहिल्यांदाच गुरू आणि शनीची ऐतिहासिक महा युती

पुणे – सूर्यमालेतील सर्वांत मोठे दोन ग्रह असलेले गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहे. दि.21 डिसेंबर रोजी गुरू आणि शनि हे एकमेकांच्या खूप जवळ दिसणार आहेत. ग्रहांची ही एक ऐतिहासिक महायुती असल्याचे खगोलविश्वातून सांगितले जात आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, ‘गुरू हा सूर्याची एक परिक्रमा 11.87 वर्षांनी पूर्ण करतो. तर शनिला 29.5 वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे 19 वर्षे आणि 7 महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी