Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र बिल माफी नाकारणा-या आघाडी सरकार विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विश्वासघात आंदोलन

बिल माफी नाकारणा-या आघाडी सरकार विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विश्वासघात आंदोलन

मुंबई ( महाराष्ट्र ) : लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले असून वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.त्याविरोधात आज वंचीत बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने राज्यातील आघाडी सरकारने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदीप वानखडे ह्यांचे नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर “विश्वासघात आंदोलन” करण्यात आले.”क्या हुवा तेरा वादा” असा साद घालीत सरकारला धारेवर धरण्यात आले.

रिपोर्ट पोस्ट

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी