Monday, April 12, 2021

इंदापूर पोलीसाची दमदार कामगिरी ४८ तासात चोरीला गेलेल्या वाळूच्या ट्रकचा लावला छडा !

इंदापुर प्रतिनिधी :-गणेश कांबळे
इंदापूर प्रशासकीय इमारत प्रांगणातून अवैद्य वाळू उपसा कारवाईत जप्त करण्यात आलेला ट्रक ६ ब्रास वाळूसह अन्यात चोरट्याने पळवून नेला अशी महसूल अधिकारी यांनी दि २१फेब्रुवारी रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.चक्क इंदापूर प्रशासकीय भवन परिसरातून ट्रक चोरीला गेल्याने महसूल विभागाच्या कारभारा संदर्भात तालुक्यातील जनतेतून उलट सुलट चर्चेला उधाण आले

इंदापूर प्रशासकीय भवनातून वाळूसह चोरीला गेलेल्या ट्रकचा शोध इंदापूर पोलिसांनी केवळ ४८ तासात लावून मुद्देमालासह ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालकाला अटक केली किरण रवींद्र दिवेकर वय २३वर्षे रा.वरवंड ता.दौंड.जि.पुणे असे ट्रक पळवून नेणाऱ्या चालकाचे नांव आहे

या संदर्भात सविस्तर हकीकत अशी की इंदापूर येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभा असलेला टाटा कंपनीचा ट्रक (एम.एच.१२ एम.व्ही.५७५१) गौण खनिजासह पळवून नेण्यात आला होता.महसूल विभागाने ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी कालठण नं.२ रेकडवस्ती जवळ करण्यात आलेल्या अवैद्य वाळू उपसा करताना ट्रक ६ ब्रास वाळूसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला होता २१ फेब्रुवारी रोजी मंडल अधिकारी सोपान हगारे यांनी इंदापूर पोलिसात वाहन चोरी गेल्याची अज्ञात व्यक्ती विरोधात लेखी तक्रार नोंवली होती.

इंदापूर पोलिसांनी सदर चोरीचा तपास करण्यासाठी आपल्या खबऱ्यांना छडा लावण्यास सांगितले. त्यापैकी एका खबऱ्यांने पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पावले उचलून सहा ६ ब्रास वाळूसह पळवून नेलेला टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेऊन चालक किरण दिवेकर यास अटक केली आहे.सोमनाथ तनपुरे रा.तनपुरेवाडी ता.इंदापूर जि.पुणे असे या ट्रक मालकाचे नांव आहे या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत

रिपोर्ट पोस्ट

Ganesh kamble
मी गणेश सुर्यकांत कांबळे मु.पो इंदापूर

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी