Sunday, January 24, 2021
Home नागरिक बातम्या पंतप्रधान मोदीनी सर्व प्रथम करोना प्रतिबंदक लस द्यावी ! राष्ट्र वादीने केली...

पंतप्रधान मोदीनी सर्व प्रथम करोना प्रतिबंदक लस द्यावी ! राष्ट्र वादीने केली मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. “१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदलाचे जवान यांना लसीकरण केले जाणार आहे. परंतू, या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. देशात लसीकरणासाठी जोरदार तयारी सुरु असून जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर ड्राय रनही भारतातच पार पडल्या आहेत.

रिपोर्ट पोस्ट

Pranali
I am Happy

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी